आई, तू कधी ‘कामोन्माद’ (orgasm) म्हणजे लैंगिकसंबंधांमध्ये ‘उत्तेजना’ अनुभवलीयस का?
मला आठवतं की, माझ्या काखेत केस यायला लागले तेव्हा कुणीतरी माझी चेष्टा केली होती, तेव्हा तू माझ्याशी बोलली होतीस. म्हणालीस, ‘तू लवकरच फूल बनणार आहे. खूप मुलं या फुलाला स्पर्श करू इच्छितील. त्यामुळे तुला काळजी घ्यायला हवी.’ मला कळलं नाही की, ‘तू मला एकदम सल्ले का द्यायला लागलीस’. पण जर कदाचित आपण त्या माझ्या शरीरात लपलेल्या छोट्या कळीविषयी आणि माझ्या बोटांनी तिला स्पर्श करण्याविषयी बोलतो असतो तर.......