आचार्य अत्रे : अखेरचा वारसदार
आचार्य अत्रे हा इसम खुल्या मनाचा व उदार अंत:करणाचा होता. त्यांच्या स्वभावात खुनशीपणा नव्हता. डूख धरून बसणे असे वृत्तीला म्हणतात, तशी त्यांची वृत्ती नव्हती, किंवा त्यांच्या स्वभावाला मुत्सद्देगिरीही जमत नसे. दोन द्यावे, दोन घ्यावे असा अगदी खुला कारभार. उधार-उसनवार काही नाही. त्यांच्या जीवनात क्रोध, आवेश, संताप असला तरी वैर नव्हते. अहंकेंद्रित असले तरी गर्व नव्हता. विनोद असला तरी क्षुद्र वृत्ती नव्हती.......