प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तीने लिहिलेल्या या कविता असल्याने त्यात कल्पनेपेक्षा वास्तवाचे चित्रण अधिक टोकदार रीतीने आले आहे
घेवरीकर यांच्या कवितेचा पट विस्तृत आहे. शिक्षणविषयक समज-गैरसमज, शाळेतील व शालाबाह्य मुलांचे भावविश्व, महापुरुषांचे विचार व आजचे वास्तव, गळती झालेली, कष्टकरी झालेली मुले भेटल्यावर होणारी घुसमट, शासकीय योजना व त्यांची तपासणी, बाहेरच्या जगाचे वास्तव व शाळेच्या आतले सुरक्षित जग, शिक्षकांच्या जगण्यातील कृतार्थता, सुंदर क्षण अशा विविध रचना या कवितांमध्ये आहेत.......