आला आला गाडा... यमाजीचा वाडा, यमाजीच्या वाड्यातनं... महानंदाला धाडा
...एकाएकी संपूर्ण पोट ढवळून मोठाल्या वांतीचा उमाळा यावा आणि पोटातलं काहीतरी भडाभडा बाहेर ओकलं जावं, तसं काहीसं झालं. माझं मेंदूमन अगदी तळापासून ढवळलं गेलं आणि काहीतरी बाहेर आलं. काहीतरी मला माहीत असलेलं आणि नसलेलंही.
हृषीकेश गुप्ते यांची ‘दंशकाल’ ही नवी कादंबरी नुकतीच राजहंस प्रकाशनाकडून प्रकाशित झाली आहे. या कादंबरीची ही झलक..........