आज कार्ल मार्क्स कालबाह्य ठरतो? काय सांगता? तो तर चिरकालीन आहे!
‘मार्क्सवाद संपलाय’ हाच विरोधाभासी अलंकार आहे. कारण मार्क्सवाद असणे हे कुठले हॉली रोमन एम्पायर असणे किंवा गडेगंज संपत्तीची मालकी असण्यासारखे नाही, जी आज आहे उद्या नाही. मार्क्सवाद अत्यंत मूलगामी विचारसरणी आहे. आणि त्यातील मूलगामी मार्क्सवाद्यांचे उद्दिष्ट, टेरी ईगलटन या इतिहासतज्ज्ञानुसार, अशा स्थितीला पोहोचणे आहे, जी प्राप्त केल्यानंतर त्यांची गरज त्यापुढे उरणार नाही.......