तेरेखोल नदी यात्रा - उगमापासून संगमापर्यंत
विकासाच्या उद्देशाने राबवलेले विविध प्रकल्प/ योजना नदी ही परिसंस्था उद्ध्वस्त करणारे, नदी प्रदूषित करणारे ठरत आहेत, हे ठळकपणे मांडले गेले. शहरांचा विकास, उद्योगांचा विकास, सिंचन, पिण्याचं पाणी, ऊर्जानिर्मिती अशासारख्या सर्व अत्यावश्यक बाबींचा दैनंदिन वापर करताना नदी परिसंस्था आणि अन्य संसाधनांचा विध्वंस केला पाहिजे असे नाही. अन्य पर्यायही उपलब्ध आहेत, मात्र ते प्रभावीपणे वापरले जात नाहीत.......