आम्हा सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे. संकल्प केला पाहिजे की, या घृणास्पद राजकारणाला बदलण्यासाठी आम्ही पुढे येणार आहोत!
अडवाणी हसून आम्हाला म्हणाले, ‘मला बावळट समजता का? मी काय रामाचं अजून एक मंदिर निर्माण करायला निघालोय का? तुम्ही माझी घोषणा नीट ऐकलेली नाहीये.’ आम्ही त्यांना म्हणालो, ‘काय आहे तुमची घोषणा? अजून एकदा सांगा!’ त्या वेळी अडवाणी म्हणाले, ‘आम्ही म्हणतो की, सौगंध राम की खाते है, मंदिर वहीं बनायेंगे. ‘वहीं’चा अर्थ काय होतोय माहितीये का? मस्जिदमध्ये!’.......