भारतीय आयटी उद्योगाचं नेमकं बिनसलं तरी काय?
भारतीय कंपन्या धोका न पत्करता धोपटमार्गावरून जात राहिल्या आहेत. सध्याच्या मोबाईल अॅप्सच्या काळात तर मोजके कर्मचारी असलेल्या स्टार्टअप्सदेखील पाच-सहा वर्षांत अब्जावधींची उलाढाल करताना दिसत आहेत. त्या तुलनेत आपल्या आयटी कंपन्या ग्राहकांना केवळ संगणकीय सेवा पुरवण्यात धन्यता मानत आहेत. जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात मूलभूत फरक केल्याशिवाय इथून पुढची वाटचाल सोपी नक्कीच नसेल........