ही जी काही हिडीस दमनशाही चाललीय, त्यात कसं ‘असायचं’ आहे आपण?
मला खरंच खूप भीती वाटतीय की, मी या अशा जगात राहतेय जिथं हे सगळं खूप नॉर्मल वाटतंय सगळ्यांना. किंवा माझ्या आसपासचे सगळेच पोटात ही भीती घेऊन वर नॉर्मलसीचा मुखवटा घालून जगतायत. हे तर फारच भीतीदायक आहे. ‘आपले – त्यांचे’, ‘माझ्या जातीचे - त्याच्या जातीचे’ या सगळ्यात माझ्या बाई असण्याची आणि माणूस असण्याची जी ‘लक्तरं’ निघतायत; त्यानं मी उभी-आडवी नासवली जातीये. दररोज.......