गल्लीत कुणाशी ओळख असो-नसो; मराठी लेखक ‘चिंता करितो विश्वाची’ बाणा सोडत नाहीत!
असं नव्हे की, लेखक किंवा कलावंतांच्या अभिव्यक्तीचा संकोच होईपर्यंत किंवा अगदी टोकाला जाऊन कलावंतांच्या हत्या होईपर्यंत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करण्याची वेळ लांबवावी. इथं केवळ इतकाच मुद्दा मांडायचा आहे की, बुद्धिनिष्ठ विचारांच्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य ही सहजासहजी मिळणारी गोष्ट नाही. संधी मिळेल तिथं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावानं गळा काढून आपण त्या विषयाचं गांभीर्य कमी करत आहोत.......