‘शि-वा-जी’ या तीन अक्षरांबद्दल प्रेम, आदर, आपलेपणा, खरं तर ‘भक्ती’ निर्माण करण्याचं काम बाबासाहेबांच्या ‘राजा शिवछत्रपति’ने केलं
‘राजा शिवछत्रपति’ या पुस्तकानं शिवाजी महाराजांना आमच्या आयुष्याचाच नाही तर, व्यक्तिमत्त्वाचा, अगदी रक्ताचा भाग बनवण्याचं काम केलं. त्या काळात वाचलेल्या कुठल्याही खऱ्या किंवा काल्पनिक, ऐतिहासिक किंवा अद्भुत कथेच्या नायकानं मनावर इतकं गारूड केलं नव्हतं. त्या गारुडामागची सत्यता, दार्शनिकता, त्याचं मूल्य, तेव्हा कळलं नव्हतं, पण आता कळतंय.......