आयुष्यभर समाजॠण फेडणारे प्रा. जैमिनी कडू मृत्युनंतरही समाजाच्या उपयोगी पडले!
पत्रकार, शिक्षक, लेखक, संघटक, प्रभावी वक्ता व सामाजिक कार्यकर्ता असलेले प्रा. जैमिनी कडू वेगळंच रसायन होतं. वाचन, लेखन, चिंतन त्यांचा स्थायीभाव होता. असं असूनही लोकांत ते रमायचे. त्यांनी कधी डोळ्याला झापडं बांधली नाहीत. प्रवाहात ते वाहवतही गेले नाहीत. चिकित्सा करायला तत्पर असत. मात्र विषमतेचा संदर्भ येताच तुटून पडत, तेव्हा भल्या-भल्या विद्वानांची भंबेरी उडत असे.......