फादर फ्रान्सिस दिब्रिटो – लिओ टॉलस्टॉय परंपरेचे विचारवंत
फादर दिब्रिटो एक ख्रिस्ती धर्मगुरू असूनही ते देवळाबाहेर देवाचे अस्तित्व शोधणारे शोधक आहेत. त्यांना लोकांत देव दिसतो आणि ते आपल्या लेखणीचा त्यासाठी वापर करतात. वसईहून प्रकाशित होणाऱ्या ‘सुवार्ता’ या मासिकाचे संपादक असताना त्यांनी त्यात अनेक प्रयोग केले. लिओ टॉलस्टॉय धर्मगुरू नसले तरी अस्सल निष्ठावंत ख्रिश्चन होते. फादर दिब्रिटो लिओ टॉलस्टॉय परंपरेचे पाईक आहेत.......