जमिनीच्या वरून आणि खालून विरोधी प्रवाह उत्तेजित होऊ लागले आहेत, हे भाजपच्या आयटी सेल आणि बाह्य रोबोंनाही कळलेले आहे!
भाजप स्वतःच्या कार्यकर्त्यांना लहानाचे मोठे करत नाही. ‘गुजरात पॅटर्न’मुळे तो काळ केव्हाच मागे पडला. लोकांना चक्क ‘विकत’च घ्यायचे असते, हेच भाजपने ठरवलेले आहे. चालू लोकसभा निवडणूक हंगामातही हेच सुरू आहे. अनेक उमेदवारांना अगदी फॉर्म काढून घेण्याच्या दिवशी दुपारी दोनपर्यंत ऑफर्स दिल्या जात होत्या. भाजपने याचीच पुढची पायरी सूरतमध्ये गाठलीय आणि त्याच्याही पुढची पायरी इंदूरमध्ये ओलांडली गेली आहे.......