मलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे
मराठी साम्राज्याचा कर्ता शहाजी किंवा शिवाजी नव्हे, तर मलिक अंबर आहे, असा भालचंद्र नेमाडे यांचा दावा आहे. ‘साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण’ या नावाची त्यांची एक पुस्तिका आहे. आपले मुद्दे पटवण्यासाठी नेमाड्यांनी छोट्यामोठ्या मर्मभेदक हकिगती सांगितल्या आहेत. नेमाड्यांचं हे सुबोध, सुरेख पुस्तक हिंदी-इंग्रजीसह सर्व भाषांमध्ये अवश्य अनुवादित व्हावं इतकं मोलाचं आहे.......