आमच्या दीर्घकालीन मैत्रीला पवारांचा उदार, समंजस, प्रेमळ आणि सौजन्यशील स्वभावच कारणीभूत!
आम्हा दोघांची मैत्री जमली कशी आणि ती टिकली कशी? लिहिण्याबाबतचा आळशीपणा आणि व्यावसायिक महत्त्वाकांक्षेचा अभाव हे दोन ‘दोष’ सोडले, तर आम्हा दोघांच्याही स्वभावात कसलंही साम्य नाही; तरीही आम्ही दोघे मित्र आहोत. मला वाटतं, आम्हा दोघांच्या दीर्घकालीन मैत्रीला पवारांचा उदार, समंजस, प्रेमळ आणि सौजन्यशील स्वभावच कारणीभूत आहे.......