कोणी त्यांना ‘भाऊ’ म्हणत, कोणी ‘कॉम्रेड पाटील’ तर कोणी फक्त ‘कॉम्रेड’. आमच्या पूर्ण कुटुंबात त्यांना ‘आप्पा’ संबोधले जाई
प्रसिद्ध प्राच्यविद्या संशोधक, ‘माफुआ’कार कॉम्रेड शरद् पाटील यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीच्या ‘क्रांतिकारी सत्यशोधक - कॉम्रेड शरद् पाटील’ या लेखसंग्रहाचे आज पुण्यात प्रकाशन होत आहे. या संग्रहात पाटील यांची कन्या, प्रा. सुजाता शिंदे यांच्या लेखाचाही समावेश आहे. वडिलांविषयीच्या हृद्य आठवणी सांगणारा हा त्यांचा लेख.......