‘आता सगळ्या वह्या बुडीत खाती’ : संग्रहाचे शीर्षक काहीही असले तरी, या कवितेच्या वह्या कधी बुडीत खाती निघणे शक्य नाही!
‘दिगंत’पासून सुरू झालेली आर्त जाणीव ‘...तरीही’, ‘दिवसेंदिवस’मध्ये अधिक तीव्र, नेमकी होत जाते आणि ‘वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ’मध्ये ती आत्मभान व विश्वभान या दोन्हींच्या जोडीने व्यापक होत ‘कदाचित अजूनही’मध्ये ही विश्वात्म सार्वभौमता समष्टीला कवेत घेताना आपला पैस आणखी रुंदावते. काळासोबत चालण्याची आणि विपर्यस्ताला प्रश्नांकित करण्याची, ही खुबी या कवितेला आवाहकतेच्या कसोटीवर गुणवत्ता बहाल करत जाते.......