‘बोलिले जे’पर्यंत मी योगायोगाने पोचलो, पण इथे पोचणे माझ्यासाठी आवश्यक होते...
‘बोलिले जे’ वाचताना अनेक विचार दाटून आले. काही ठिकाणी आधीच मनात चाललेल्या अस्वस्थतेला या पुस्तकाने वाचा फोडली, तर काही ठिकाणी वेगवेगळ्या विषयांमधले नवे समांतर दुवे हाती लागले. यात एलकुंचवार सरांची पुस्तके, नाटके, त्यातील प्रतिमा आणि प्रतीके, संगीत, संतसाहित्य, विज्ञान तत्त्वज्ञान, पर्यावरण, मूल्यव्यवस्था, वास्तवाचे ज्ञान आणि भान, जगण्याचा अर्थ, माणसाचे स्थान या व इतर अनेक विषयांवर मुक्तचिंतन येते.......