जेव्हा ‘मुखवटा’ निसटला होता, तेव्हाच्या ‘खऱ्या वाजपेयीं’ना आपण विसरायला नको!
सहिष्णुतेचा उपदेश करताना हजारो निष्पाप नागरिकांच्या कत्तलीकडे दुर्लक्ष केल्याचा दोष - नोव्हेंबर १९८४मध्ये राजीव गांधींनाही लागला किंवा जानेवारी १९९३मध्ये पी. व्ही. नरसिंहरावांनाही लागला, तोच दोष वाजपेयींनाही पंतप्रधान म्हणून लागला याची नोंद इतिहास अवश्य घेईल. राष्ट्रीय दूरदर्शन प्रसारणात गुजरातमधील दंगेखोर, कत्तलखोर लोकांवर कडक कारवाई करून पायबंद घालण्यात येईल, हे त्यांनी सांगायला हवं होतं.......