पांडुरंग सदाशिव खानखोजे नावाचा माझा ‘माथेफिरू’ बाप!
प्रत्येक वेळी अपयशाचा आलेला अनुभव बरोबर घेऊन रिकाम्या हातांनी वडील जर्मनीला परतले. हव्या असलेल्या क्रांतिकारकांची यादी ब्रिटिशांकडे होती. त्यात वडिलांचे नाव होते. अशा क्रांतिकारकांना अंदमानला पाठवले जाई. आपला पाठलाग करणारा ब्रिटिशांचा गुप्त विभाग आपल्यावर केव्हाही झडप घालेल, म्हणून वडिलांनी मेक्सिकोमध्ये आश्रय घेतला. वडील तिथे राहून गरीब शेतकऱ्यांना मदत करू लागले. त्यांना ‘शेतकीतज्ज्ञ’ असा लौकिक मिळाला.......