या झुंडबळी हिंसाचाराला शासन, पोलीस आणि राजकीय प्रतिनिधी या सर्वांनी सर्व बाबतीत दिलेला प्रतिसाद अत्यंत अपुरा आणि सदोष आहे...
गेली काही वर्षे झुंडबळीचा धोका आणि घटना सतत वाढत असूनसुद्धा या वारंवार घडणाऱ्या घटनांची नोंद घेण्यात सरकार कमी पडत आहे. या वाढत्या झुंडबळींच्या घटनांची नोंद घेण्यात आणि त्यावर उपाय योजना करण्यास शासन अजिबात उत्सुक नाही याचेच हे निदर्शक आहे. अशा घटनांची अधिकृत नोंद ठेवण्यातील सरकारची अनास्था म्हणजे झुंडबळीच्या वाढत्या प्रकारांना तोंड देण्यास आणि याचा प्रसार रोखण्यात सरकारचे अपयश दर्शवते.......