‘हिंदाडी विस्तारवादा’चा आज उदंड झालेला दशानन, हा ह्या सगळ्या पाताळयंत्री आंतरप्रक्रियांचे एक रूप आहे!
जोवर सामाजिक आणि भाषिक सौदार्हाचे वातावरण देशभर, महाराष्ट्रात होते, तोवर त्रिभाषासूत्राचा विचार तितका खुपला नाही, जाचक वाटला नाही. पण आता सत्तेच्या अरेरावीचा जो स्तर, दर्जा आपल्याला दिसतो, त्या खुनशी वातावरणात हा त्रिभाषासूत्राचा विचार प्रचंड अनैतिक, अत्यंत त्याज्य आणि रद्दणीय झालेला आहे. मराठी भाषेच्या मुळावर उठलेला हा हिंदीधार्जिणा विचार अगदी खडबडून जागे होऊन तातडीने झटकून टाकला पाहिजे.......