भारत काय शिकला कोरोना महामारीपासून? काही शिकला की नाही?
आजमितीस जगातील कुठलाही देश छातीठोकपणे हे सांगू शकणार नाही की, त्याने कोरोना महामारीवर योग्य व्यवस्थापनानं विजय मिळवला आहे. कुणाचे लाट थोपवण्यात चुकले, तर कोणाचे लसीकरणात. पण हे करत असताना फार कमी देश आहेत, जे उघडपणे आपल्या चुका कबुल करतात. डॉक्टरांना, शात्रज्ञांना त्यांच्या चुकांचा ऊहापोह न करता खुलेपणाने बोलण्याची मुभा द्यावयास हवी होती.......