पानिपतोत्तर भाऊसाहेब पेशवे – खरे की तोतया? खरे ते तोतया नि खोटे ते खरे!
पानिपत-पूर्व घटना व पानिपतचे युद्ध या विषयांवर सखोल अभ्यास झाला आहे. परंतु पानिपतनंतरच्या घटनांकडे दुर्लक्ष झाल्याचे सातत्याने नजरेस येते, खासकरून भाऊसाहेब पेशव्यांचे काय झाले, याविषयी अनास्थेचा अंधकार सर्वत्र दाटलाय. नास्तिक हे ईश्वरास अमान्य करणारे, तर पानिपतोत्तर भाऊसाहेब नामकाचे अस्तित्व नाकारणाऱ्या नास्तिक कारभाऱ्यांनी व नंतर नास्तिक अभ्यासकांनी भाऊंबद्दलचे अंकूर मुळासकट उपटून काढले. नास्तिक बळावले.......