विषाणू विरोधातल्या युद्धाच्या बाबतीत आपल्याला ‘उद्योगपर्व’ ठाऊकच नाही… पहिल्या लाटेच्या आधीही नव्हते आणि अत्यंत विनाशकारी दुसऱ्या लाटेच्या आधीही नाही
आपण या विषाणूचा नायनाट करण्यासाठी २१ दिवसांच्या ‘महाभारत युद्धा’ची घोषणा केली. ‘महाभारता’त पहिल्या १८ दिवसांच्या युद्धाचे वर्णन ‘भीष्मपर्व’, ‘द्रोणपर्व’, ‘कर्णपर्व’ आणि ‘शल्यपर्व’ असे केलेले आहे. पण ‘भीष्मपर्वा’च्या आधी येणारे, खूप मोठे असे ‘उद्योगपर्व’! युद्धाची तयारी या ‘उद्योगपर्वा’मध्ये विस्तृतपणे वर्णन केलेली आहे. विषाणू विरोधातल्या युद्धाच्या बाबतीत आपल्याला ‘उद्योगपर्व’ ठाऊकच नाही.......