माओ यांनी मशागत केलेल्या जमिनीत तेंग यांनी समृद्धीचे बी पेरले
तेंग यांचा मार्ग योग्य होता की नव्हता, याबाबतच्या चर्चा चालू राहतील. परंतु सध्या तरी त्यांच्या मार्गानेच चीनला एक महाशक्ती बनवण्यात मोठी भूमिका बजावली आहे, हे स्पष्ट आहे. चीनने ही उपलब्धी ‘No two denials’ सिद्धान्ताला मानून प्राप्त केली आहे. परंतु चीनची आज जी काही व्यवस्था आहे, ती समाजवादी आहे काय? चीन खरोखरच अजूनही मार्क्स, एंगल्स, लेनिन, स्टालिन, माओ यांच्या मार्गावर चालत आहे का?.......