षांताराम पवार यांची कविता : चैत्रिक संवेदनशीलतेचा भाषिक उमाळा (उत्तरार्ध)
षांतारामांच्या कवितेचं आवर्जून दखल घ्यावी असं आणखी एक वैशिष्ट्य असं की, त्यामध्ये बेगडीपणाचा, कृतकपणाचा लवलेश नाही. षांतारामांची कविता ही मूलत: विधानांची कविता आहे, जिला आपण त्यांचा स्वच्छंद असं म्हणू शकतो! या कवितेचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की, या कविता वाचताना त्यांचं वय जाणवत नाही. आज जी समकालीन कविता लिहिली जाते त्यात षांतारामांची कविता बेमालूम मिसळून जाऊ शकते.......