‘जे ‘अ-क्षर’ असेल, ते टिकणारच!’ - अरुण साधू
मराठी व इंग्रजी वृत्तपत्यांतून पत्रकार-संपादक या नात्याने सतत पुरोगामी विचारांचा प्रचार-प्रसार करणे आणि कथा व कादंबऱ्या या माध्यमांतून मराठीतील ललित साहित्यात काही मूलभूत व महत्त्वाच्या विषयांना हात घालणे हे काम अरुण साधू यांनी मागील जवळपास ५० वर्षे केले आहे. मराठी भाषेच्या संदर्भात व महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात त्यांची अशी ठोस भूमिका आहे.......