“मराठी समीक्षा अजून बाल्यावस्थेतच आहे, असे मला वाटते. लहान मूल जसे मोठ्याचे बोट धरून चालते, तसे आपली समीक्षा पाश्चात्य समीक्षेचे बोट धरून चालते.” - सुधीर रसाळ
त्यांचे सिद्धांत घेऊन त्यांचे उपयोजन आपण आपल्या वाङ्मयाबाबत करतो. त्यांच्या वाङ्मयीन सिद्धांतांच्या पाठीमागे त्यांनीच निर्माण केलेलं तत्त्वज्ञान किंवा समाजशास्त्र, मानसशास्त्र असे कुठले न कुठले शास्त्र उभे असते. अगदी अॅरिस्टॉटलपासून हे पाहायला मिळते. परंतु आपल्यापैकी बहुतेकांना त्यांचा जुजबी परिचय असतो. त्यामुळे त्यांच्या वाङ्मयीन सिद्धांताचं आपलं आकलन वरवरचं असतं.......