हे संमेलन म्हणजे उजव्या विचारधारेच्या कट्टरतावादी राजकारणाला दिलेला नकार आहे. हे संमेलन इथल्या दलित-बहुजनांचा असहमतीचा आवाज आहे
इथल्या प्रत्येक शोषणाला आणि शोषकांच्या भिन्न भिन्न रूपातल्या विभाजनवादी विचारधारांना, त्यांच्या कट्टरतावादाला, त्यांच्या फॅसिझमला आमचा विरोध आहे, आमची असहमती आहे, हे सांगण्यासाठीच हे दलित- बहुजन-भटके-विमुक्त-आदिवासी जनांचं, समतावादी मूल्य मानणाऱ्या जनांचं संमेलन आहे, असे मला वाटते.......