जोपर्यंत सृजनशीलता जीवंत आहे, तोपर्यंत सामान्य माणसाचा आवाज जीवंत आहे. जोपर्यंत माणूस सुख-दुःखाच्या भावनेनं भरलेला आहे, तोपर्यंत सृजनशीलतेची शक्यता जिवंत आहे
आपण हे समजून घेतलं पाहिजे की, जोपर्यंत सृजनशीलता जीवंत आहे, तोपर्यंत सामान्य माणसाचा आवाज जीवंत आहे. जोपर्यंत माणूस सुख-दुःखाच्या भावनेनं भरलेला आहे, तोपर्यंत सृजनशीलतेची शक्यता जिवंत आहे. मराठीतील श्रेष्ठ कवी संत तुकाराम म्हणतात- ‘बुडता हे जन न देखवे डोळां। येतो कळवला म्हणउनि।।’ मला वाटतं की, वर्तमान संस्कृतीत सृजनशीलतेचं हेच काम आहे.......