पुरोगामी कोण? प्रतिगामी कोण? आपण कोण?
सध्या वैचारिक असहिष्णुता, धार्मिक तेढ, समान नागरी कायद्याची चर्चा, अल्पसंख्याकांना असुरक्षित वाटेल असं सामाजिक वातावरण, धार्मिक उन्माद, राज्यघटनेविषयी बेगडी प्रेम, उच्चवर्गीयांची दादागिरी, हुकूमशाहीची भलावण, संसदेचा अव्हेर, युद्धजन्य उन्माद पसरवण्याचा प्रयत्न, ‘देशप्रेमा’ची स्वघोषित व्याख्या करून विरोधकांवर ‘देशद्रोह्या’चा शिक्का मारणं, पुरोगाम्यांची निंदानालस्ती करणं, हे उद्योग देशभर चालू आहेत........