चला, भावना दुखावून घेण्याची शपथ घेऊयात
एकदा मू (MOO) ची स्थापना झाली की, मग त्या अंतर्गत कोणत्या खात्यांची अधिक भरभराट होण्याला वाव आहे, ते ठरवता येऊ शकतं. जसं गोवंशाचं मांस खाणं, गाईंची वाहतूक, आंतरधर्मीय विवाह, मशीद आणि मंदिरातले भोंगे, राष्ट्रगीत, पाकिस्तानी अभिनेते वगैरे या सर्व मुद्द्यांनी निवडणुकीत उत्तम यश मिळवून दिलेलं आहे. आपल्या अन्य मरणाच्या मार्गाला लागलेल्या पारंपरिक कलांपेक्षा भावना दुखावण्याची कला जास्त आर्थिक परतावा देणारी आहे.......