नाहीतर, कदाचित मी क्रिकेटपटू म्हणून यशस्वी होऊच शकलो नसतो!
“हे पुस्तक माझ्याविषयी आहे. माझ्या क्रिकेटच्या कारकीर्दीविषयी, माझ्या आयुष्याविषयी. माझं यश आणि अपयश याविषयी. माझं सामर्थ्य आणि माझी दुर्बलता याविषयी. एक खेळाडू म्हणून माझ्या कारकीर्दीपासून तरुण, नवोदित खेळाडूंनी काही धडे घ्यावेत असंही मला वाटतं. एक बाप आपल्या मुलाला म्हणाला होता त्याप्रमाणे, ‘माझ्या आयुष्यात मी वीस चुका केल्या; तू नवीन वीस चुका कर.’.......