आमच्या राखेतून उडू दे तुमचे स्वप्नपक्षी!
किती अपात्रांच्या भजनी लागलो होतो गेल्या, साठ वर्षांत! गांधीवाद, समाजवाद, साम्यवाद, राजेशाही, पेशवाई, शिवशाही, रामराज्य, लोकराज्य,
लोकशाही, एक ना दोन! नॅचरल जडीबुटीची एकत्रित औषधी असावी तशी तुमची एकाधिकारशाही, कशी ऑरगॅनिक स्वदेशी-विदेशी मशागतीवर पोसलेल्या सर्व वैचारिक किटकांचा नाश करून, गोमातेच्या शुद्ध मलमूत्रतुपासारखी साजूक, सात्त्विक आणि गुणकारीही.......