‘पाकिस्तान’ हा तुमचा आदर्श आहे का?
‘अल्ला, आर्मी आणि अमेरिका’ हेच पाकिस्तान चालवतात, असं म्हटलं गेलं, ते त्यातून. एकदा आधाराची सवय लागली की, मग तो आधार कधी अमेरिकेकडे, तर कधी चीनकडे मागितला जातो. पण त्यातून ‘फेल्ड स्टेट’ असणं अधिकच अधोरेखित होत जातं. धर्माच्या पायावर आक्रमक राष्ट्रवाद उभा राहिला की, हे असं होत जातं. मग धर्म कोणता आहे, हा प्रश्न गैरलागू आहे. धर्मांध शक्ती देशाची संस्कृती ठरवू लागल्या की, अनर्थ अटळ असतो.......