इतकेच मला जाताना पोलिंग बूथवर कळले होते, मतदानाने केली सुटका प्रचाराने छळले होते!
राज्यात काल महानगरपालिका, पंचायती समिती आणि जिल्हा परिषदा यांच्यासाठी मतदान झालं. त्याविषयी अनेक तर्क-कुतर्क लढवले जात आहेत. काल दिवसभर व्हॉटसअॅप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियावर त्याविषयीच्या चर्चांना उधाण आलं होतं. फडणवीस जाणार, मुंबईत शिवसेना येणार, मनसेची पुन्हा धुळधाण होणार, पुण्यात राष्ट्रवादी येणार अशा अनेक प्रकारच्या चर्चा कालही रंगल्या होत्या, आजही रंगतील. उद्या निकालानंतर सर्व स्पष्ट होईलच. .......