ब्रिट यांनी जे लिहिले, ते एका दशकानंतर भारतातील कडव्या राष्ट्रवादाच्या, फॅसिझमच्या धर्माच्या कोंदणातील अवताराला इतके तंतोतंत लागू पडेल, याची कोणी कल्पनाही केली नसेल!
थेट उत्तरे मिळतीलच असे नव्हे, पण कोणताही अभिनिवेश न बाळगता किमान काही प्रश्नांवर चर्चा व्हावी, लोकांनी त्या चर्चेतून त्यांचे निष्कर्ष काढावेत, हा प्रयत्न या लिखाणामागे आहे. ते प्रश्न आहेत, मुख्यत्वे- भारत हा देश नेमका काय आहे? गेल्या दोन शतकांमध्ये आपला प्रवास नेमका कसा झाला आहे आणि आपण नेमके कोठे उभे आहोत? कोणत्या मुक्कामावर पोचणार आहोत?.......