‘पिढीजात’ आत्मचरित्रात्मक कादंबरी वाटण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही!
नवनाथ शेळके हा या कादंबरीचा नायक. तो बोलतो, चालतो, कामं करतो आणि बहुतेकदा ऐकतो, पाहतो. त्याच्या जगण्याचा, विचारांचा असा एक परिप्रेक्ष्य आहे, जो त्याच्या मनातल्या भूमीशी जोडला गेला आहे. खेड्यातून अभावात शिक्षण घेऊन तो एका व्यवस्थेचा अपरिहार्य घटक बनला आहे. खरे तर त्याच्यासाठी ती अनिवार्य आपत्तीसारखी व्यवस्था आहे. त्या अर्थाने नवनाथ हा एकटा नाही, तो अनेकार्थांनी प्रातिनिधिक असा ठरावा.......