राहुल गांधी काही महात्मा गांधी नव्हे, परंतु तो महात्म्याच्या पदचिन्हांचा शोध घेत निघाला आहे, हे नक्की!
आज ‘भारत जोडो’ यात्रेचा २६वा दिवस. यात्रेने ३५०० किमीपैकी ६८७ किमी अंतर पार केले आहे. अजून २८८३ किमी अंतर शिल्लक आहे. हजारो लोक एका पवित्र ध्येयाने प्रेरित होऊन जेव्हा सामूहिक कृती करतात, तेव्हा अशी कृती आपले लक्ष वेधून घेते. तर हजारो यात्रींचे नेतृत्व करत रस्त्याच्या कडेला उभ्या लोकांना अभिवादन करत, त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार करत अत्यंत सहज आणि नैसर्गिकपणे चालत असलेल्या हसतमुख राहुलला पाहणे, हा एक सुखद अनुभव अ.......