माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......

साहित्यकृतीमुळे वाचकांमधला माणूसपणाचा अंश वाढवा आणि जात-धर्म-पंथाचा फुकाचा गर्व गळून पडावा, अशी अपेक्षा असते. गीतांजली श्री यांच्या ‘बुकर इंटरनॅशनल’ने हे पुन्हा सिद्ध झाले!

गीतांजली श्री यांच्या ‘रेत समाधी’ या हिंदी कादंबरीच्या डेझी रॉकवेल यांनी केलेल्या इंग्लिश अनुवादाला ‘बुकर इंटरनॅशनल’ हा नोबेलनंतरचा सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार मिळाला. पुरस्काराची रक्कम किती? तर तब्बल ५० हजार पौंड. इंग्रजी साहित्यातल्या अभिजनांची मक्तेदारी असलेला बुकर पुरस्कार आणि त्याची डोळे फिरवून टाकणारी रक्कम ऐकून काहीतरी अदभुत, अद्वितीय नि अवर्णनीय घडलेय, याची अनेकांची खात्री झाली. पण.......

मनाचे ‘समाधान-असमाधान’ यातून रोजच्या निरस जगण्यात उभे राहणारे नाट्य, हे या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. या कथा माणसातल्या सौंदर्याबरोबरच विरूपतेचेही दर्शन घडवतात आणि विजिगीषेबरोबरच माणसाच्या आत्मनाश, आत्मघाती वृत्तीवरही बोट ठेवतात

मानवी स्वभाव वैशिष्ट्ये-वैगुण्याचा कोपरा नि कोपरा तपासत प्रिय-अप्रिय वैश्विक सत्यापाशी वाचकास आणून सोडते, ती अस्सल कथा किंवा ‘माणूस असा का वागतो?’ या प्रश्नाचे सोपे उत्तर देण्यापेक्षा ‘माणूस असाही वागतो’ असे सुचवते ती अस्सल कथा- या काही निकषांवरही प्रस्तुत संग्रहातल्या कथा उजव्या ठराव्यात, अशा आहेत. यातल्या काही कथांनी एक सामान्य वाचक म्हणून माझा पिच्छा पुरवला आहे.......