भारतीय पुरुषाची विकृत मानसिकता
‘भारतीय पुरुष’ हा अनेक विसंगतींनी भरलेला प्राणी आहे. सार्वजनिक जीवनात तो ‘राष्ट्र’वादी असतो, तर घरात ‘कर्ता पुरुष’ असतो. राष्ट्राच्या दृष्टीनं तो ‘गोरक्षक’ असतो, तर घरात तो ‘स्त्रीदेहा’चा रक्षक असतो. ‘राष्ट्र’ आणि ‘स्त्रीदेह’ या त्याच्या दोन महान जहागिऱ्या असतात. त्या दोन्हींना त्यानं हद्दी ठोकून ठेवलेल्या असतात. त्या हद्दींचा रक्षक या नात्यानं तो ‘कुणी अतीपणा करत नाही ना,’ हे जातीनं पाहतो........