‘पहिले १००० दिवस’ धोक्याचे की संधीचे? असे प्रश्न माझ्या डोक्यात हजार घणांचे घाव घालत होते…
मला जे कळालं होतं, मी ते तिला सोप्या शब्दांत समजावून सांगितलं. संगीता हे ऐकून जरा चिंतीत झाली की, आता माझ्या मुलीला मी कशी वाढवू? खेळ, खाणं आणि प्रेम ही त्रिसूत्री सांगितली. तिच्या मुलीच्या जेवणासाठी माझ्याकडून रोज शिजवलेलं अंडी, शेंगदाणे-गूळ, खिमटी, दूधाची पावडर असा आहार देण्याचंही कबूल केलं. संगीतापुरता व माझ्यापुरता मी हा प्रश्न सोडवला खरा, पण भारतात दरवर्षी जन्म घेणाऱ्या २.५ करोड मुलांचा प्रश्न कोण सोडवणार?.......