जुलूम, अन्याय यांच्याशी आपल्या समर्थ अन् मर्द लेखणीने कलापूर्ण झुंज देणारे अण्णा भाऊ मला आयुष्यभर मिळाले!
पोवाड्याच्या कलेला वेगळी बैठक देणारे अण्णा भाऊ, पोवाडा सौंदर्यपूर्ण उभा करणारे अण्णा भाऊ, पोवाड्याद्वारे जनजागृती साधून-जनशिक्षण करून जनतेच्या हातून पराक्रम घडवून आणणारे अण्णा भाऊ व्यक्तिजीवनात अतीव दु:खी होते, सर्व सर्व प्रकारे. तरीही त्यांनी आपल्या व्यक्तिगत दु:खाचं स्तोम माजविले नाही. पण त्यांच्या ‘पोवाडा कलेला’ महाराष्ट्र शारदेच्या मंदिरात (तिचाच सच्चा पुत्र असून) स्थान नाही. यामुळे ते फार फार होरपळून जात.......