भगतसिंगांनी ९२ वर्षांपूर्वी लिहिलेला लेख - ‘धर्मांध दंगली व त्यावरील उपाय’
धर्मांध दंगली भारताची पाठ कधी सोडतील, हे सांगता येणे कठीण आहे. जगाच्या नजरेत या दंगलींनी भारताला बदनाम केले आहे. या अंध:विश्वासाच्या प्रवाहात सर्वजण वाहत चालल्याचे चित्रच आपल्याला दिसत आहे. थंड डोक्याने विचार करणारा हिंदू-मुसलमान अथवा शीख आज अपवादानेच दिसतो. बाकी सगळे हातात काठ्या, तलवारी व सुरे घेऊन परस्परांची डोकी फोडत आहेत. हिंदुस्थानामधील नेत्यांनी अशी काही घाण केली आहे की, त्याविषयी न बोललेलेच बरे!.......