‘द ब्लड टेलिग्राम’ : १९७१च्या युद्धाचा आंतरराष्ट्रीय साज
परिस्थिती अत्यंत गंभीर होती आणि त्या क्षेत्रात वावरणाऱ्या भारतीय नौसेनेच्या एकाद्या युद्धनौकेबरोबर जर अपघाती भेट घडली असती तर त्याचे परिणती अण्वस्त्रसंघर्षाचा आरंभ होण्यात झाली असती. परंतु एकतर अमेरिकेची ही चाल केवळ धमकीवजा आहे, व्हिएतनामच्या दलदलीत फसलेली अमेरिका दुसरी आघाडी उघडण्यास धजावणार नाही आणि सोविएत संघाचे आरमारही हालचाल करू शकते, हे सर्व लक्षात घेऊन इंदिरा गांधी अविचल राहिल्या. .......