तुला-मला निरंतर शोधण्याची गोष्ट
आमच्या सहजीवनाचा गाभाच मुळात संवाद आहे. सतत वाहता, निर्हेतुक-सहेतुक, सापेक्ष-निरपेक्ष, विदेह-सदेह असा संवाद. त्यानंच आमच्यात कधीच नसलेला संकोच, अवघडलेपण आणि औपचारिकता यांना सतत नात्यातून दूर ठेवलंय. आमच्यात एक ‘नवरा-बायको’ असं रजिस्टर लग्नपद्धतीतून अस्तित्वात आणलेलं कायदेशीर नातं असलं तरी एकमेकांकडे केवढ्या तरी तटस्थ, वस्तुनिष्ठपणे आम्ही पाहू शकतो.......