मालिकांचे कालबाह्य, जुनाट, गुळगुळीत साचे बदलणार तरी कधी?
मुख्य नायिकेच्या रूपात अजूनही घरातल्या मुलाच्या, पुरुषाच्या भोवती रुंजी घालणाऱ्या, स्वयंपाकघरात रमलेल्या बायका तेवढ्या चांगल्या; तर पुरुषांना तोडीस तोड उत्तर देणाऱ्या, आपल्याला हवे तसे कपडे घालणाऱ्या, चतुराईनं धंद्यातली गणितं सोडवणाऱ्या, टॉप बॉसेस असणाऱ्या, ड्रिंक्स, वाईनला न बिचकणाऱ्या, स्मार्ट व्यक्तिमत्त्वाच्या बायका फक्त खलनायिकेच्या भूमिकेतच का दाखवल्या जातात?.......