मोदी तर आले, आता पुढे काय? पुढे आहे तो संघर्ष...
बहुसंख्याकांचा जमातवाद हा अत्यंत धोकादायक असतो. आजवर तो बाटलीत बंद होता. त्यावर सुसंस्कृत समाजाचे दडपण होते. पण मतांच्या बेगमीसाठी ती बाटली खुली करण्यात आली. हिंदुराष्ट्राचे, राममंदिराचे, कलम-३७० रद्द करण्याचे आमिष दाखवून त्या अतिरेकी धर्मवादी राक्षसाला बाटलीबाहेर काढण्यात आले. आता तो आपली स्वप्ने पूर्ण करण्याची मागणी मोदी सरकारकडे केल्याशिवाय राहणार नाही.......